
आजकालच्या तांत्रिक दृष्ट्या प्रगत जगात "Plug and Play" ची संकल्पना जोर धरू पाहत आहे. संगीत क्षेत्र ह्याला अपवाद नाही. त्यात भारतीय संगीत तर नाहीच. तंत्रज्ञानाने भारतीय संगीताच्या आधार स्थम्भापर्यन्त घुसखोरी करून थेट तनपुऱ्याची प्रतिकृती निर्माण केली आणि इलेक्ट्रॉनिक तानपुरा अस्तित्वात आला. भारतीय संगीतामधेतंबोरा हे वाद्यआधारभूत मानले आहे. तंबोऱ्याच्या झान्कारामध्ये भारतीय शास्त्रीयसंगीत गायले जाते. तंबोऱ्यातून ऐकू येणाऱ्याश्रुती (स्वरनव्हे) संगीतकाराला रागउभा करण्याकरिता मदतकरतात वा दिशा देतात. तंबोराउत्तम जुळवणे हीएक अत्यंत महत्वाचीसांगीतिक बाब आहे!
जेव्हापासून मी संगीताच्या मैफली ऐकायला लागलो तेव्हापासून मला असा दिसून आलं कि पूर्वी गायक वादक लाकडी तनपुऱ्याची जोडी वापरत असत आणि एखादा इलेक्ट्रॉनिक तानपुरा वापरात. कालांतराने असे दिसून आले की जोडी तानपुरा आणि एकपेक्षा अधिक इलेक्ट्रॉनिक तानपुरे साथीसाठी वापरले जाऊ लागले. आज केवळ एक लाकडी तानपुरा (किंवा तो देखील नाही) आणि दोन किंवा अधिक इलेक्ट्रॉनिक तानपुरे साथीला घेऊन सदर होणाऱ्या मैफिली आपल्याला दिसायला सुरवात झाली आहे. कालांतराने खरा तानपुरा साथीला असलेली मैफल ऐकायला मिळणे मुश्किल होईल काय असा प्रश्न मनाला अस्वस्थ करून सोडतो. असो.
तानपुरा जुळविण्याची क्रिया
पहिल्याने आपण तानपुरा जुळविण्याच्या क्रियेकडे बघूया. तानपुरा जुळविताना कलाकार reference सूर (हार्मोनियम किंवा सारंगी चा षड्ज) आणि तानपुऱ्याचा सूर हे सतत compare करत असतो. Reference सूर आणि तानपुऱ्याचा सूर आपला मेंदू compare करत असतो आणि त्यानुसार आपण तानपुऱ्याचा सूर कमी अगर जास्ती करतो. ह्या प्रक्रियेमधे सूर 'डोक्यात बसणं' ही क्रिया होत असते! षड्ज 'डोक्यात' बसवण्यासाठी तानपुरा जुळविण्याचा प्रक्रियेमुळे निश्चीत मदत होते. कलाकाराची सूराच्या सुक्ष्मतेचे आकलन करण्याची क्षमता तानपुरा जुळविताना सिद्ध होत असते. पंचम/मध्यम, खर्ज जुळविताना स्वर संवादित्व समजण्यास मदत होते. ह्या सर्व बाबी इलेक्ट्रॉनिक तानपुरा जुळविताना तितक्याश्या लागू होत नाहीत त्याचे कारण आहे इलेक्ट्रॉनिक तानपुऱ्याची stability! मुळातच तो तानपुरा जुळवलेला असतो! पंचम/मध्यम, खर्ज जुळवायची तर गरजच लागत नाही. जोड जुळविण्यात जी मजा आणि कस लागतो तो इलेक्ट्रॉनिक तानपुरा जुळविण्यात लागत नाही. आजकाल तर iTanpura मध्ये presets चा वापर केल्याने, कलाकाराला क्वचितच तानपुरा "जुळवायची" वेळ येईल. गायक कलाकार हार्मोनियम वादकाला स्वराचे ट्युनिंग विचारण्यासाठी "प्लस २ कि मायनस २?" अशी सर्रास भाषा वापरताना दिसतात! मैफलीच्या आधी greeroom मध्ये शांतता असताना केवळ इलेक्ट्रॉनिक तानपुरा चालू करणं याउलट right from scratch तानपुरा जुळविणे ह्यामध्ये खूप फरक आहे; नंतरची पद्धत ही सूर 'डोक्यात बसण्यासाठी' निश्चित जास्ती संयुक्तिक आहे. लाकडी तानपुरा जुळवताना कलाकार सुराशी (षड्जाशी) "sync" होत असतो. इलेक्ट्रॉनिक तानपुरा हा जुळला आहे असे कलाकार गृहीत धरतो आणि पर्यायाने कुठेतरी तानपुऱ्याकडे दुर्लक्ष होते आणि ती "sync" होण्याची क्रिया घडताच नाही. कलाकाराला सतत खात्री करावी लागत नाही कि तानपुरा सूरात आहे कि नाही. हे जरी एका अर्थी चांगले असले, तरी मुद्दा हा कि कलाकाराचं तानपुऱ्याकडे दुर्लक्ष होतं हे नक्की!!!
२/५
गुणी कलाकार हे निःसंकोचपणे मान्य करतील की भोपळ्याच्या तानपुऱ्यातून येणाऱ्या नादाचा असर, त्याची वातावरण निर्मिती, भावनिर्मिती ही अत्त्युच्य आहे हे निर्विवाद आहे. भोपळ्याच्या तानपुऱ्याच्या झंकारामध्ये असलेली शांतता, तरलता, गंभीरता, नेटकेपणा, सुडौलपणा आणि तो नाद ऐकून मिळणारं समाधान हे काही औरच असतं. असा असर इलेक्ट्रॉनिक तानपुऱ्यातून निर्माण करणे अशक्य आहे. हं, एक क्षणभर थांबा! आजकालचा iTanpura तसा असर निर्माण करण्याच्या जवळ जाऊ पहातोय हे खरं आहे पण त्यालाही मर्यादा आहेत. भारतीय संगीत हे सूक्ष्मतेकडे जाते, वा ते जावे हीच अपेक्ष असते! किंबहुना, संगीताच्या सुक्ष्मतेकडे जाण्यासाठीच कलाकार आपले आयुष्य वेचतो, तेव्हा आधारभूत असलेल्या तानपुऱ्यामधील ह्या सूक्ष्मतेकडे दुर्लक्ष करून कसे बरे चालेल? सूक्ष्मतेकडे लक्षपूर्वक जवळ जाण्याच्या प्रयत्नांमधल्या आपल्या मर्यादा कलाकार स्वतःच ठरवत असतो. सुक्ष्मतेची होणारी जाणीव समृद्ध करणे हे सर्वस्वी कलाकाराच्या हातात असते. ह्यासाठी सुरावरील प्रेम, श्रद्धा, आपुलकी, शरणागती, आपले सूर छान लागावेत अशी इच्छा ह्या सर्व गोष्टी कलाकाराने अंगी बाणवल्या, तरच भोपळ्याच्या तानपुऱ्यामधील नादाच्या त्या सुक्ष्मतेचे आकलन कलाकाराला होण्याचा संभव आहे (तानपुरा जुळविण्यापासून ह्या सुक्ष्मतेची जाणीव होऊ लागते म्हणून तानपुरा जुळविणे हे महत्वाचे वाटते). मुद्दा हा कि आपल्या कलेच्या सुक्ष्मतेपर्यंत जाण्याचे धाडस, लागणारे कष्ट आणि जिद्द आहे का आज कलाकारांमध्ये? इलेक्ट्रॉनिक तानपुरा आणि खरा तानपुरा ह्यामधील सूक्ष्मतेचा फरक आज कलाकाराला जाणवतोय का? ती जाणीव समृद्ध करून घेण्याची इच्छा, उर्मी आणि त्यासाठी लागणार संयम/वेळ आजच्या कलाकारांना, गुरूंना, विद्यार्थ्यांना आणि श्रोत्यांना आहे का? जर ह्या सर्व प्रश्नांचे उत्तर नकारार्थी असेल तर भोपळ्याचे तानपुरे रियाजासाठी तर नाहीच पण मैफिलीत शोभेचे म्हणून वापरायला हरकत नाही! कारण नादाची ती सूक्ष्मता आणि असर ह्याचा आनंद घेण्याची इच्छा, जाणीव आणि वेळ नसेल तर भोपळ्याचे तानपुरे वापरणे व्यर्थ ठरेल! (It will be completely underutilized!)
डॉ. अरविंद थत्ते आणि डॉ. अशोक दा. रानडे ह्यांच्या म्हणण्यानुसार श्राव्य इंद्रियाची (आणि एकंदरच इंद्रियांची) ग्रहणक्षमता ही कमी होत चालली आहे. १०० वर्षापूर्वीचा 'कान' आणि आजचा 'कान' ह्यात खूप फरक झाला आहे. 'smartphone' मधे गुंतलेल्या मुलाला आईने मारलेली हाक जर ऐकू येत नसेल, तर त्याला सुरांच्या सूक्षमतेचे ग्रहण कसे होणार? असो. आज संगीताचे व्ह्यवहार काना-आड केले जात आहेत ही दुर्दैवाची बाब आहे.
३/५
तानपुरा छेडणे
तानपुरा वादन करण्याच्या पारंपारिक बैठकीत तानपुरा उभा धरून वाजवितात असे दिसून येते. तानपुऱ्याचा base हा जमिनीवर टेकवून वादकाचा उजवा पाय गुढगा दुमडून, गुडघ्यावर कोपर ठेऊन तानपुरा वादन करण्याची ही बैठक आहे. ह्या बैठकीच्या फक्त एका गुणधर्माकडे पहिले तर तारेच्या बरोबर मध्ये वादन होते आणि वाजण्याचे स्थान गायकाच्या कानाच्या सर्वात जवळ आणि समांतर असल्याने तानपुऱ्याचा ध्वनी गायकाला अपेक्षित आहे तसा ऐकू येतो. तानपुरा ऐकण्याची गायकासाठी ही सर्वात योग्य position आहे. म्हणून रियाज करताना देखील तानपुरा उभा धरून कानाजवळ वाजवायला हवा. (डॉ. अशोक दा. रानडे ह्यांचा संगीत संगती मधील ह्यासंदर्भात लेख जरूर वाचा) वेगवेगळ्या positions वरून ऐकलं तर तोच तानपुरा सुराला किंचित वेगळा ऐकू येतो हे ध्यानात घ्यायला हवं. त्यामुळे तानपुरा ऐकण्याच्या position ला खूप महत्व आहे. तानपुरा वादनाची लय काय असावी? ढोबळ उत्तर असे कि पहिली तार छेडल्यावर क्षणभर विश्रांती आणि मग बाकी तीन तारा छेडणे. तर सूक्ष्म उत्तर असे कि तानपुरा छेडल्यावर पंचमाच्या तारेतून मध्यसप्तकातला पंचम आणि रिषभ ऐकू येणे, खर्जातून गांधार ऐकू येणे, जोड छेडल्यावर षड्जाची भरणा मिळणे, मध्यमाच्या तारेतून त्याचे संवादी स्वर ऐकू येणे, नाद गोलाकार, एकसंध, आनंददायी असणे इत्यादी... हे सर्व परिणाम होतील अश्या लयीमध्येच तानपुरा छेडला पाहिजे (मग तानपुरा मशीन मध्ये त्याचा अंक जो काही असेल तो असो!). संगीतासाठी पोषक वातावरण निर्मिती करण्याची क्षमता ह्या नादामध्ये असायला हवी. मुळात कलाकाराला ऐकून समाधान झालं पाहिजे आणि रागातले सूर त्याला तानपुरा छेडल्यावर 'दिसले' पाहिजेत. तानपुरा छेडल्यावर कलाकार गाण्यासाठी उतावीळ झाला पाहिजे किंवा तानपुऱ्याचा झंकार ऐकत राहावं आणि 'आss' सुद्धा करू नये असे तरी वाटले पाहिजे! गाण्याच्या लयीबरोबर तानपुरा वादनाची लय बदलायला हवी का? - नाही! ती द्रुत लयीच्या अविष्कारामध्ये ओघात आपोआप बदलू शकते का? - हो! किंबहुना बहुतांशी वेळा बदलते. जशी तबलजीची आणि गायकाची लय कमी जास्ती होते तशी तानपुरा छेडण्याची पण होते!
इलेक्ट्रॉनिक तानपुरा जमिनीवर ठेऊनच वाजवावा लागतो. त्यामुळे तानपुरा ऐकण्याच्या position ची योजना होऊ शकत नाही (तशी खास सोय विचार करून करावी लागेल). इथे एक गोष्ट ध्यानात घेण्यासारखी आहे ती म्हणजे वाजविणाऱ्या व्यक्तीच्या छेडण्याच्या पद्धतीवर आणि लयीवर इलेक्ट्रॉनिक तानपुरा अवलंबून नाही. manual error पूर्णपणे eliminate होतो. कलाकाराने तानपुरा जुळविल्यावर तो दुसऱ्या व्यक्तीने वाजविल्यामुळे होणारा बदल हा इलेक्ट्रॉनिक तानपुऱ्या मध्ये होत नाही.
कलाकारांनी स्वतःला आणि आपल्या शिष्यांना तानपुरा वादन नीटपणे शिकवणे गरजेचे आहे. मैफिलीत नुसते तानपुरे वाजून उपयोग नाही तर ते अपेक्षित वातावरण निर्मिती करतील असेच वाजविले गेले पाहिजेत. तानपुरा योग्य पद्धतीने छेडण्याची गरज, महत्व, जागरूकता ह्याचा विचार प्रत्येक कलाकाराने केला पाहिजे.
सोय आणि गैरसोय!
सध्याच्या काळामध्ये सोयीला फार महत्व आलय. काय केलं म्हणजे जास्त सोयीचे होईल ती गोष्ट करण्याला प्राधान्य असते. थोडक्यात आळस वाढत चाललाय. कारण आपल्याकडे वेळ "कमी" आहे असे सर्वांना वाटू लागले आहे! असो.
पहिल्यांदी मैफिलीसाठी तानपुऱ्या बद्दल बोलायचे झाले तर आजकालच्या कलाकारांना आपले तानपुरे विमानातून कसे घेऊन जायचे अशी अडचण पडते. रेल्वे/बस मध्ये देखील तानपुरा ने-आण करण्यात अडचण येते. परदेश दौरा म्हणाल तर विषयच संपला. अडचण रास्त आहे पण मग कुमारजीं सारखे दिग्गज कलाकार दोन तानपुऱ्यांसाठी चक्क रेल्वे चे दोन बर्थ रिझर्व करायचे असे मी ऐकले आहे. म्हणजे आपल्या सोयी बरोबर आपल्या तानपुऱ्यांची सोय देखील ते करत असत! मोठ्या शहरांमध्ये त्यांनी तानपुऱ्यांच्या जोड्या विकत घेऊन ठेवल्या होत्या असे मी ऐकतो! म्हणजे त्या शहराच्या जवळ गाणं असलं कि ती जोडी आणायला सांगायची. असो. आजकाल कलाकारांच्या कार देखील hatchback, त्यामुळे तिथे सुद्धा भोपळ्याचा तानपुरा म्हणजे जरा अडचणच! एकंदर काय तर इलेक्ट्रॉनिक तानपुरा हा दळणवळणासाठी अत्यंत सोयीस्कर आहे. एक आयपॉड/आयपॅड, एक-दोन स्पीकर आणि वायर्स घेतल्या कि काम झाले. त्यासाठी रंगीत डीझायनर (fragile चा stickers सहित) बॅग पण दिसतात. बाहेर गावी, परदेशी होणाऱ्या मैफलीसाठी इलेक्ट्रॉनिक तानपुरा नेणे हे सोयीचे होते. प्रवास सुद्धा एकदम सोयीचा होतो. भोपळ्याचे तानपुरे घेऊन जाण्याचा 'व्याप' होत नाही! कारण त्यांची काळजी कशी आणि कोण घेणार? प्रवासात नेमका स्टेटस उपडेट करताना तानपुरा कुठे पडून तुटला तर काय? इथे Cost Cutting हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे. कला हे उपजीविकेचे साधन असणाऱ्या कलाकारांना ही बाब निश्चित दखल घेण्याजोगी आहे यात शंका नाही. नाईलाजास्तव कलाकार थोडं compromise करण्यास तयार होत आहेत. भोपळ्याचा तानपुरा घेणे परवड नाही अशी ही काही मंडळी आहेत (त्यांना आयपॉड/आयपॅड विकत घ्यायला कसे परवडतात ते देव जाणे). एकंदर भोपळ्याचा तानपुरा घेऊन प्रवास करण्याची आर्थिक आणि शारीरिक जबाबदारी घ्यायला कलाकार फारसे उत्सुक नाहीत. कायदेशीर बाब पाहिलीत तर विमान प्रवासात कदाचित काही खास परवानगी अथवा exemption घ्यावे लागेल. (तानपुऱ्याचा भोपळ्यामधून अजून तरी हिऱ्यांची किंवा Rdx ची तस्करी केली नसावी कोणी). बाहेरगावी मैफिल असेल तर तिथे तानपुऱ्याची सोय होण्यासाठीचा आग्रह कलाकार मंडळी कमी धरतात असे माल वाटते. त्यात आयोजकांचीही भूमिका महत्वाची ठरते. त्यांच्याही आर्थिक, मर्यादित मनुष्य बळ, वेळ, जवाबदारी घेणारे मोजके कार्यकर्ते अश्या अनंत अडचणी असतात. शिवाय कलाकारांची तानपुऱ्यासाठी आणि तानपुरा वादकांची केलेली मागणी ही अवास्तव आहे असाही समज आयोजक काही वेळा करून घेतात. पूर्वीच्या काळचे बुजुर्ग कलाकारांनी तानपुरे घेऊन कसा प्रवास केला इत्यादी किस्से सर्वश्रुत असतात. त्या कलाकारांचे उपजीविकेचे साधन कला नव्हते काय? आजकाल मैफिलीत भोपळ्याचे तानपुरे नसतील तरी चालेल अशी भूमिका दुर्दैवाने होत चाललीये. माझ्या मते ह्याला उपाय असा कि सर्व कलाकारांनी जमेल तितके साहाय्य बाहेर गावच्या कलाकारांना केले पाहिजे. आपले तानपुरे आणि वादनासाठी कलाकार पुरवणे इत्यादी. किंवा एखाद्या बड्याप्रायोजकाने तानपुरेच sponsor करून विकत घेऊन द्यावे. इलेक्ट्रॉनिक तानपुरा वाजविण्यास लागणाऱ्या कलाकाराची गरज लागत नाही. शिवाय इलेक्ट्रॉनिक तानपुरा जुळवावा लागत नाही म्हणजे त्यात वेळ जाणार नाही. भोपळ्याचा तानपुरा जुळलाच नाही किंवा जुळवता आला नाही तर तो धोका पण टळला. पुन्हा श्रोते आणि आयोजक तानपुरा जुळवे पर्यंत ताटकळत बसण्याचा प्रश्न नाही.
रियाज करताना गुणी विद्यार्थी आणि स्वतः performing artist बहुतांशी वेळा तानपुरा घेऊन रियाज करतात असा माझा समज आहे. त्यात सुद्धा रियाजासाठी त्या प्रसंगी उपलब्ध असलेला वेळ आणि इच्छा ह्यावर अवलंबून असू शकते. रियाजाला बसणार अर्धा तास त्यात मग १० मिनटे तानपुरा लावण्यात जाणार असतील तर तो न घेतलेलाच बरा! शिवाय घरातली परिस्थिती, उपलब्ध जागा, घरातल्या इतर अडचणी (लहान मुले खुंट्या पिळतात वगरे) ह्यामुळे भोपळ्याचा तानपुरा गैरसोयीचा होऊ शकतो. स्वरमंडळ घ्यायची ज्यांना इच्छा (काहींना हौस) आहे ते कदाचित इलेक्ट्रॉनिक तानपुरा घेऊनच रियाज करणार.
गाणे शिकवताना जर 'tution' असेल तर ताशी दर असतो. म्हणजे तिथे तर भोपळ्याचा तानपुरा म्हणजे पूर्ण गैरसोय. ताशी ५-१० मिनिटे तानपुऱ्यावर 'घालवली' तर कुरकुर सुरु होऊ शकते आणि मास्तर 'गाणं' शिकवत नाहीत असा समज करून विद्यार्थी सोडून जाऊ शकतो!! पण बुजुर्ग कलाकार तालीम देताना अजूनही भोपळ्याचे तानपुरे वापरत असतील अशी आशा आहे.
तानपुऱ्याचा मैफिलीत उपयोग
मैफिलीमध्ये तानपुऱ्याची साथहीसर्वातमहत्वाचीआहेआणिआजकालसर्वातदुर्लक्षित. तानपुराउत्तमस्थितीतआहेका, नीटपणेसुरेलजुळवलाआहेका, तानपुरावादकबरोबरवाजवतोआहेका, तानपुऱ्याची position बरोबर आहे का, तानपुऱ्यासाठीचा mike योग्यठिकाणीठेवलाआहेका (तोचालूआहेका?!) ह्या गोष्टींची खबरदारीकमीकटाक्षानेघेतलीजाते.
मैफिलीमध्ये गायक कलाकारालासर्वातमहत्वाचीगरजअसतेतीसूरनीटपणेऐकूयेण्याची. सूरनीटऐकूआलानाही तर गायन होऊशकतनाही. दोनतानपुरेम्हणूनचघेतलेजातातजेणेकरूनसूरदोन्हीकानांनीऐकतायावा. म्हणजेसूरएकाकानानेऐकलाआणिदुसऱ्याकानानेसोडूनदिलाअसंम्हणायचीसोयराहातनाही! आताथेटभोपळ्याचेतानपुरेआणिइलेक्ट्रॉनिकतानपुरेह्यांचेमैफिलीतस्थानबघूया.
आजकाल मैफिलीतील बाह्यपरिस्थितीम्हणजेबाहेरचेआवाज (गोंगाट), मोबाईल, वाहनांचेआवाज, हॉलमधीलआवाज, पंख्यांचेआवाज, प्रेक्षकांच्याश्वासाचाआवाजइत्यादीइतकेवाढलेआहेतकिगाणेबजावण्याच्याठिकाणीशांततामिळणेअवघडझालेआहे. त्यातध्वनिक्षेपकवापरल्याने, इतरसाथीवाद्यांच्याआवाजातवाढझालीआहे. अशापरिस्थितीतकलाकारालाभोपळ्याच्यातानपुऱ्याचानादसूक्ष्मअसल्यानेसूरनीटपणेऐकूयेणेकठीणहोते. ऐकूयेतनाहीह्याचेकारणश्रवणेंद्रियांचीग्रहणक्षमताकामीझालीआहेकित्याकडेदुर्लक्षकेलेजातआहेहेकलाकारांनीस्वतःठरवायचे. म्हणजेसमजाइलेक्ट्रॉनिकतानपुराघेतलाचनाहीतरभोपळ्याचेतानपुरेस्वच्छऐकूयेतीलअसेच sound setting कलाकार करतील! मैफिलीतइलेक्ट्रॉनिकतानपुराघेण्याचेमुख्यकारणतानपुऱ्याचाभरणावाढविणेहोय. मुळातइलेक्ट्रॉनिकतानपुराहाभोपळ्याच्यातानपुऱ्यापेक्षाअधिकमोठ्यानेवाजवतायेतो. म्हणूनचइलेक्ट्रॉनिकतानपुराअत्यंतउपयोगीठरतोआहे. इलेक्ट्रॉनिकतानपुरावापरलाकिकलाकाराचीएकतरीतक्रारकमीहोतेपणअधिकसुरेलगायचीजबाबदारी/संभाव्यतावाढते?
पूर्वीच्या काळी इलेक्ट्रॉनिकतानपुरेनसल्यानेफक्तभोपळ्याचेतानपुरेवापरलेजातअसत.
Comments